Ad will apear here
Next
पुरंदरच्या तरुणांच्या ‘ऑस्करवाडी’ वेबसीरिजला जगभरातून उदंड प्रतिसाद
भिवरी तरुणांची पहिली मराठी वेबसीरिज
ऑस्करवाडी या मराठी वेब सीरिजमधील एक दृश्य

पुणे : पुरंदर तालुक्यातील भिवरी या गावातील तरुणांनी बनवलेल्या ग्रामीण भागातील जीवनावर आधारित ‘ऑस्करवाडी’ या मराठी वेबसीरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, त्यातील ‘शेतकऱ्यालासुद्धा इज्जत आहे’ या व्हिडिओला देशभरातून लाखो प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 

अवकाळी पावसाचा तडाखा, दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी पिचला जात असताना, त्याने केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून आपण त्याला सन्मानाने वागवायला हवे, असा संदेश या व्हिडिओतून देण्यात आला आहे. तरुणाईकडून मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला जात असून, जवळपास ७० लाख लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे.  

‘ऑस्करवाडी’चे लेखक, दिग्दर्शक अक्षय कटके, परेश मरकड यांच्यासह कलाकार व अन्य मान्यवर

‘ऑस्करवाडी’चे आतापर्यंत ६४ भाग प्रसारित झाले असून, जगभरातले प्रेक्षक याच्याशी जोडले गेले आहेत. पुरंदर तालुक्यातच याचे चित्रीकरण केले जात आहे. या वेब सीरिजचे लेखक आणि दिग्दर्शक अक्षय कटके आहेत. संवाद लेखन परेश मरकड यांचे तर, छायाचित्रण आणि संकलन मंगेश टाकले यांचे आहे. स्थानिक कलाकारांनाही यात संधी मिळाली असून, कुंडलिक घिसरे, प्रियांका पालकर, पूजा वाल्हेकर, सायली कामठे, शुभम कोरडे, कादंबरी होले आदी कलाकार यात काम करत आहेत. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZQNCH
Similar Posts
‘उच्च शिक्षणासाठी सामाजिक संस्थांचा हातभार महत्त्वाचा’ पुणे : ‘शेतीविषयक शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण बदल केले जात आहेत. सरकारनेही चांगल्या योजना निर्माण केल्या आहेत. शिवाय, आपल्याकडे बहुतांश विद्यार्थी मुख्य व्यवसाय शेती असलेल्या भागातून येतात. मात्र, आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येतात. अशावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या
तुमच्या जुन्या पांढऱ्या टी-शर्टपासून बनू शकतो कागद ! पुणे : नाताळच्या सणाला झाडाला सजवून ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देणे अपेक्षित असते, मात्र प्रत्यक्षात हा हेतू साध्य होताना दिसत नाही. याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘पुणे हँडमेड पेपर्स’च्या पुढाकाराने जुन्या कपड्यांपासून बनविलेल्या हँडमेड पेपर्सच्या वस्तू, सजावटीचे सामान, वह्या, भेटकार्ड
टाकाऊ घटकांपासून बनवलेल्या कपड्यांचा अनोखा फॅशन शो पुणे : ‘पुणे तेथे काय उणे’ ही उक्ती सार्थ करत, पुण्यामध्ये चक्क कचरा या संकल्पनेवर आधारित फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. मिस आणि मिसेस माय अर्थ नावाच्या या फॅशन शोमध्ये प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, इलेक्ट्रॉनिक वेस्ट (खराब झालेले की-बोर्ड, माउस, सीडी, डीव्हीडी) आणि इतर टाकाऊ वस्तूंपासून बनविलेले ड्रेस सादर करण्यात आले
एक लिटर पेट्रोलमध्ये १६० किलोमीटर; पुण्याच्या अथर्वने विकसित केली इलेक्ट्रिक-पेट्रोल हायब्रिड बाइक पुणे : एक लिटर पेट्रोलमध्ये तब्बल १६० किलोमीटर धावणारी बाइक! विश्वास बसत नाही ना; पण हे खरे आहे. अथर्व राजे या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने पेट्रोलची बचत करण्यासाठी जुन्या बाइकवर संशोधन करून ही अनोखी इलेक्ट्रिक पेट्रोल हायब्रिड बाइक विकसित केली आहे. त्यामुळे पेट्रोलच्या खर्चात बचत होईल, शिवाय ती पर्यावरणपूरकही असेल, असे त्याचे म्हणणे आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language